Trending

Sindhudurg Police Website | नवीन अपडेट्ससह नवीन सुविधा

Sindhudurg Police Website | New features with new updates

सिंधुदुर्ग : सुरक्षित पर्यटनासाठी पर्यटकांना आता सहजपणे पोलिसांची मदत उपलब्ध होणार आहे. तशी सुविधा सिंधुदुर्ग पोलीस विभागाने आपल्या नव्याने अपडेट केलेल्या वेबसाईट मध्ये केली आहे. अशी माहिती सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे त्यांच्या अडचणीच्यावेळी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक आणि सुरक्षाविषयक समस्यांमध्ये त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्ह्यातली सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करण्यात आली असून हेल्पलाईन नंबर या वेबसाईट वर देण्यात आला आहे. तसंच नाव नोंदणीची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. असंही अगरवाल यांनी सांगितलं. यावेळी वेबसाईटचं डेमो सादरीकरण करण्यात आलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम जानेवारी महिन्यात दिला होता. त्यामध्ये सर्व विभागांनी स्वतःची वेबसाइट अद्ययावत करावी हा मुद्दा होता. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस विभागाने आपली वेब साईट अद्ययावत केली आहे. हि वेबसाईट आकर्षक असावी, वापरकर्त्याला सोयीची असावी आणि सर्व सायबर हल्ल्यापासून सुरक्षित असावी असे तीन मुद्दे विचारत घेऊन हि वेबसाईट बनविण्यात आली आहे. हे वेबसाईट बनविण्याच काम शंभर टक्के पूर्ण झालं नसलं तरी हि वेबसाईट खुली करण्यात आली असल्याचं अगरवाल यांनी सांगितलं

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker