Trending
Holi Special | होळीसाठी आदिवासी भागात होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी सेवा संकल्प समितीचा उपक्रम
Holi Special | Seva Sankalp Samiti's initiative to stop tree felling in tribal areas for Holi
नाशिक : उन्हाळ्याच्या सुरूवातीला निर्माण होणाऱ्या पाण्याच्या समस्येमुळे आदिवासींचं होणारं स्थलांतर तसंच होळीसाठी आदिवासी भागात होणारी वृक्षतोड थांबवण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन नाशिक जिल्ह्यातल्या सेवा संकल्प समितीनं अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ही समिती नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक , पेठ , सुरगाणा या तालुक्याच्या वाड्या-पाड्यांवर होलिका दहनासाठी लागणाऱ्या उत्तम दर्जाच्या गोवऱ्या ची निर्मितीचा उपक्रम राबवत आहे .आदिवासी महिला आपल्या घरातील अथवा गावातील गुरांच्या शेणा पासून या गोवऱ्यांची निर्मिती करून या समितीला विकतात,या उपक्रमामुळे या तालुक्यातील आदिवासी भागातील महिलांना रोजगार मिळत आहे त्याचबरोबर होळीमुळे होणाऱ्या वृक्षतोडीवरही अंकुश येत आहे.


