CM Devendra Fadnavis | महाराष्ट्र में बनेगा शक्तिपीठ महामार्ग | मुख्यमंत्री फडणवीस की घोषणा
CM Devendra Fadnavis | Shaktipeeth Highway will be built in Maharashtra | Announcement by Chief Minister Fadnavis
मुंबई : शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे, मात्र लादायचा नाही, असं सांगत विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून महामार्ग उभारला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाविरोधात कोल्हापुरातले शेतकरी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका मांडली. कोल्हापुरात या महामार्गाला शेतकऱ्यांचं समर्थन वाढत आहे, कोल्हापुरातल्या एक हजार शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या समर्थनार्थ स्वाक्षरीचं निवेदन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोल्हापूरसह वर्धा, यवतमाळ, सांगली या प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकाऱ्यांची जागा देण्यासाठी तयार असल्याबाबत निवेदनं प्राप्त झाली असल्याचं त्यांनी सदनाला सांगितलं. पीओपी मूर्ती बंदीच्या विरोधात आणि याबाबत स्पष्टता यावी यासाठी राज्यातील विविध मूर्तिकार संघटनांची मागणी लक्षात घेऊन, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत याला पीओपी मूर्तींच्या परवानगीला मुदत देण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. नव्या शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं एमपीएससी म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकी सारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली. कृषी अभियांत्रिकी सारख्या ज्या तांत्रिक अभ्यासक्रमांची पुस्तकं मराठीतून उपलब्ध नसतील, ती पुस्तकं कालबद्ध कार्यक्रम आखून मराठीतून उपलब्ध करून दिली जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. टोरेस सारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठ्या व्याज परताव्याचं आश्वासन हा ९९ टक्के प्रकरणांमध्ये घोटाळा असतो त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक करू नये असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं. एसटी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्वावर बसगाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचे कार्यादेश एसटी महामंडळाच्या स्तरावर संगनमत करून काढण्यात आले असं सांगत याच्या मागे कोण आहे.. ? याची एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यापूर्वी सकाळी विशेष बैठकीत कालची शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची चर्चा आजही झाली. सत्ताधारी सदस्यांनी केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांकडे लक्ष वेधलं आणि या उपायोजना अधिक बळकट करण्याची मागणी केली. विरोधकांनी मात्र सरकारच्या कृषी विषयक धोरणांवर टीका केली. कांदा, सोयाबीनसारख्या पिकांना योग्य भाव देण्याची मागणी या चर्चेत करण्यात आली. राज्यात येत्या एप्रिलपासून रेडिरेकनरचे दर दहा टक्क्यांनी वाढणार असल्याची अफवा असून यावर जनतेनं विश्वास ठेऊ नये असं आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत केलं. रेडीरेकनरचे दर ठरवण्याबतचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून हे दर अत्यंत न्याय्य पद्धतीने ठरवले जातील, गरीबांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं.



