https://www.youtube.com/live/VaNDKbybdDs?si=BERQ-JVxKYjm_pmB nana patole live | मुंबई से नाना पटोले की प्रेस कॉन्फ्रेंस लाइव महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालासंदर्भातच काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आज टिळक भवन, मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार, आ. नितीन राऊत, आ.अमित देशमुख आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. जनतेला वाऱ्यावर सोडावे लागले तरी चालेल परंतु नरेंद्र मोदींच्या 'मित्रा'च्या आदेशाशिवाय राज्याला मुख्यमंत्री मिळणार नाही, हे दुर्दैव आहे. आम्ही मत दिलं नाही तरीही हे सरकार निवडून कसं आलं? हा अनेक पत्रकार, विद्वान आणि जनतेला पडलेला प्रश्न आहे. काँग्रेस पक्षातर्फे 'भारत जोडो' यात्रेच्या धर्तीवर 'स्वाक्षरी मोहीम' राबवून देशाचे महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि निवडणूक आयोग प्रमुखांना बॅलेट पेपरने निवडणूक घेऊन जनतेचा कौल घेण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. आपल्या मताचा योग्य वापर व्हावा ही जनभावना असते. लोकशाही आणि लोक तांत्रिक व्यवस्था वाचवण्यासाठी मा. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस पक्षाच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.