Trending

काँग्रेसमध्ये लोकशाहीच्या नावाखाली राजेशाही जिवंत; सुधांशु त्रिवेदीचा राहुल गांधी वर हल्लाबोल

Monarchy is alive in Congress under the name of democracy; Sudhanshu Trivedi attacks Rahul Gandhi

मुंबई/प्रतिनिधि: भाजपाचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी नुकतेच विधान केले होते की “भारतीय लोकशाहीवर हल्ला होत आहे“, त्यानंतर त्रिवेदी यांनी गांधी यांच्या लोकशाहीबाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी राहुल गांधी यांना अशा कुटुंबाचा वारसदार म्हटले, ज्यांनी काँग्रेसमध्ये लोकशाहीच्या नावाखाली राजेशाही जिवंत ठेवली आहे.

पत्रकार परिषदेत भाजपच्या तर्कांचे मुद्दे

त्रिवेदी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, “गेल्या ३६ तासांत देशाने दोन वेगळे दृश्य पाहिले. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या जगातील सर्वात मोठ्या संस्थेच्या शताब्दी पर्वाचे आयोजन झाले, आणि त्याच प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेची प्रतिमा असलेले नाणे जारी केले. तर दुसरीकडे, १४० वर्षांची काँग्रेस, जी गेल्या १०० वर्षांपासून एका कुटुंबाच्या वर्चस्वाखाली आहे, त्यांच्याकडून पुन्हा एकदा देशविरोधी सूर उमटले. राहुल गांधी यांचे अशा प्रकारच्या विधानांत काहीही नवीन नाही. त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये भारताबद्दल नकारात्मक बोलण्याची परंपरा आहे.” त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, “राहुल गांधींमध्ये असे काय विशेष आहे, की त्यांनाच परदेशातील विद्यापीठांत बोलावले जाते? काँग्रेसमध्ये पी. चिदंबरम, अभिषेक मनु सिंघवी, शशी थरूर, मनीष तिवारी यांसारखे विद्वान आणि विषयतज्ज्ञ आहेत. जयराम रमेश किंवा सॅम पित्रोदा यांसारखे बुद्धिजीवी कधीच का बोलावले जात नाहीत? पण राहुल गांधींनाच परदेशात बोलावले जाते, हे मोठे यक्षप्रश्न आहे.”

भारतातील विद्यापीठांमध्ये निमंत्रण न मिळणे

त्रिवेदी यांनी या मुद्द्यावरून असेही प्रश्न उपस्थित केले की, “भारतामधील कोणत्याही विद्यापीठात राहुल गांधींना कधीच बोलावले गेले नाही. २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस केंद्रात सत्तेत असतानाही त्यांना विद्यापीठात बोलावले गेले नाही. मग केवळ परदेशी विद्यापीठातच त्यांना का बोलावले जाते?” भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी स्पष्ट केले की राहुल गांधी यांचे विधान फक्त देशविरोधी शक्तींच्या हितासाठी वापरले जाणारे साधन आहे. त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर कुटुंब वर्चस्व आणि लोकशाहीवर तडा याबाबत टीका केली आणि राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांतील भाषणांवर संशय व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker