Dhananjay Munde Resigns | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा
Dhananjay Munde Resigns | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा
https://youtu.be/2QZ_8_LfgIQ?si=kBUy4IzlPjjH0_h6
Dhananjay Munde Resigns | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून, पुढच्या कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडे यांच्या निकटवर्तीयांची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे विरोधक तसंच भाजप आमदार सुरेश धस अनेक दिवसापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. दरम्यान, या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे आज नागरीकांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी धस यांनी केली.



