Trending

Food and Drug Administration seizes insect-infested betel nuts worth Rs 70 lakh in Solapur

Food and Drug Administration seizes insect-infested betel nuts worth Rs 70 lakh in Solapur

सोलापूर अन्न औषध प्रशासन विभागाने जवळपास ६९ लाख ४५ हजार ८३ रुपयांची रंगमिश्रित व किटकबाधित सुपारी गुरुवारी जप्त केली आहे. तसेच हे सुपारी घेऊन येणारे वाहनही ताब्यात घेतले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. विजापूरहून सोलापूरला ट्रक क्रमांक आरजे ११, सीजी ९११५ हे वाहन रंगमिश्रित आणि किटकबाधित सुपारी घेऊन येत असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार देसाई यांनी अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे, नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी यांचे पथक तयार करुन ही कारवाई केली. वरील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रंगमिश्रित व किटकबाधित निकृष्ट दर्जाची सुपारी आढळून आली. यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी टोणपे यांनी किटकबाधित व रंगमिश्रित सुपारीचे नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. तर उर्वरित २४ हजार ४९८ किलो ६९ लाख ४५ हजार १८३ रुपये किमतीचा साठा जप्त करुन ताब्यात घेतला आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker