Trending

Parle Festival 2024 to be held from 21st to 30th December 2024 – Mumbai

Parle Festival 2024 to be held from 21st to 30th December 2024 - Mumbai

पार्ले महोत्सव २०२४ चं २१ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजन  मुंबईतल्या सांस्कृतिक, क्रिडा, कला क्षेत्राचं आकर्षण असलेल्या पार्ले महोत्सव २०२४ हा आमदार पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखाली विलेपार्ले इथं २१ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान होत आहे. पार्ले महोत्सवाचं यंदाचं २४ वं वर्ष  आहे.  या महोत्सवात विविध वयोगटात वैयक्तिक आणि सांघिक अशी सुमारे ३ हजार ५०० पारितोषिकं असून ६० हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, असा प्राथमिक अंदाज आहे. पार्ले महोत्सवाचं विलेपार्ले इथलं साठ्ये महाविद्यालय संकुल, दुभाषी मैदान तसंच विविध ठिकाणी आयोजन करण्यात आलं असून विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरदेखील उपस्थित राहणार आहेत.   पार्ले महोत्सवात क्रिडामध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉली बॉल, मल्लखांब, बॉक्स क्रिकेट, शरीर सौष्ठव, फुटबॉल, रस्सीखेच, बुद्धीबळ, कॅरम, गोळाफेक, योगा, धावणे, स्लो सायकलिंग, वेट लिफ्टिंग, स्केटिंग, पिकल बॉल, मेन्स फिजिक्स फिटनेस, दहीहंडी स्पर्धा आहेत. कलामध्ये चित्रकला, रांगोळी, मेहंदी, हस्ताक्षर, सांस्कृतिकमध्ये समूह नृत्य, नृत्य (एकल), नृत्य (जोडी), मराठी आणि हिंदी गायन, कराओके पुरुष, महिला तसेच युगुल गायन स्पर्धा आहेत. विशेष विभागात सदृढ बालक, होम मिनिस्टर, श्लोक पठण, प्रश्न मंजुषा तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. पार्ले महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी  दूरध्वनी ९०८२०७८९६८, ०२२-२६१३६५१३, २६१७७१२५ वर संपर्क साधावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker