
“सिंधुदुर्ग के बीच होंगे हाई-टेक! एआई सीसीटीवी से बढ़ेगी सुरक्षा”
"Sindhudurg Beaches to Go Hi-Tech! AI CCTV to Enhance Security"
नई दिल्ली/प्रतिनिधि: सिंधुदुर्गातल्या समुद्र किनाऱ्यांवर एआय-आधारित सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. देवगड, मालवण आणि वेंगुर्ले यांसारख्या सागरी हद्दीतल्या समुद्रकिनाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई इथं झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. बंदर आणि जेटींवरील जहाजांवर मोठ्या संख्येन परप्रांतीय कामगार कामासाठी येत असल्याने, या परिसरात संशयित दहशतवादी किंवा गुन्हेगार लपून बसण्याची आणि त्यामुळे सागरी सुरक्षेस धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एआय-युक्त सीसीटीव्ही सर्व्हिलन्स यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण ९२ लँडिंग पॉईंट्स आहेत. या सर्व ठिकाणी पोलीस यंत्रणा किंवा सुरक्षा दलाचे अधिकारी तैनात करणे शक्य नाही. अशा संवेदनशील ठिकाणी समाज विघातक शक्ती आणि संशयित दहशतवादी गुन्हेगार येऊन लपून बसण्याची शक्यता आहे. या धोक्याला प्रतिबंध घालण्यासाठीच ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त सीसीटीव्ही सर्व्हिलन्स यंत्रणा उभारण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.



