Trending
CM Eknath Shinde यांनी ठाण्यात आपल्या निवासस्थानी कुटुंबियांसह केली होळी साजरी
CM Eknath Shinde celebrated Holi with his family members at his residence in Thane.
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आपल्या निवासस्थानी कुटुंबियांसह होळी साजरी केली. यावेळी त्यांनी, राज्यातील नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक आणि प्रदूषण विरहीत, नैसर्गिक रंगाची होळी खेळण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबरीनं सध्या महाराष्ट्र विकासात अग्रेसर होत आहे. गेल्या अडीच वर्षातल्या विकासात आता विरोधकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन शिंदे यांनी आजच्या सणाचं औचित्य साधून केलं. यापूर्वी टेंभी नाका इथं त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि याठिकाणी उपस्थित शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांसह होळी साजरी केली.



