Abu Azmi च्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची एकनाथ शिंदेंची मागणी
Abu Azmi च्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची एकनाथ शिंदेंची मागणी
https://youtu.be/qwRpn08KLRI?si=odn24px0CaC86CWz
Abu Azmi च्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची एकनाथ शिंदेंची मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी केलेल्या औरंगजेबाच्या कथित उदात्तीकरणावरुन आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेमध्ये सत्ताधारी आमदारांनी अबु आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तसंच त्यांना हे अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची मागणी लावून धरली. सत्ताधारी आमदारांनी या मुद्यावरुन आक्रमक भुमिका घेतल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनीही या भुमिकेचं समर्थन केलं. अबु आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी त्यांच्या विरोधात ठाण्यामध्ये वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीसांनी आझमी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. अबु आझमी यांच्यावर सरकारनं खरोखरच कारवाई करुन दाखवावी अशी भुमिका शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडली



