Marathi Language Day | पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा
Marathi Language Day | पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा
https://youtu.be/x7k9EPTMP3o?si=Mv6-ZU_cGW_nkDDb
Marathi Language Day | पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील प्रसिद्ध कवी, नाटककार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने विसूभाऊ बापट यांच्या ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. तसेच यावेळी माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणपूरक गणपती उत्सव स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर तसेच आमदार विक्रांत पाटील, उपायुक्त सर्वश्री कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने उपस्थित होते.आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.



